सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमूल्य शिकवण

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

समष्टी साधनेचे महत्त्व

अ. व्यष्टी साधनेत नामात अडकायला होते, तर समष्टी साधनेत मनाच्याही पुढे लवकर जाता येते.

आ. सेवेतून निर्विचार अवस्था लवकर आल्याने नामातील शब्दांच्या पलीकडे जाता येते.

इ. नाम हाही एक विचारच आहे. शेवटी मोक्षाला जातांना तुम्हाला नामही त्यागावे लागते. समष्टी साधनेत हे लवकर शक्य होते.

ई. ‘सतत शिकण्याच्या अवस्थेत रहायचे’, हा महामंत्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्याला दिला आहे. हा महामंत्र आपल्याला सतत शिष्यावस्थेत रहाण्यास साहाय्य करतो.

सेवा

अ. अध्यात्मात पगारावर कोणीही काम करत नाही, तर कृपाळू अशा भगवंताच्या प्रेमासाठी सेवा करतात.

आ. ‘उत्तम सेवा कशी करायची ?’, हे शिकता आले पाहिजे. भगवंताच्या कृपेची प्राप्ती सेवेतूनच होते.

इ. भगवंत स्वतः पुष्कळ सुंदर आहे. भगवंताला सेवेमधून नटवायचे असेल, तर आनंदाने सेवा करायला हवी.

ई. भगवंताच्या कृपाचैतन्याचा आनंद सेवेमधून घेता आला पाहिजे.


Multi Language |Offline reading | PDF