रामजन्मभूमी प्रकरणी सर्व खासदारांच्या कार्यालयात संकल्प सभा होणार !

  • ‘भाजप राममंदिर बांधत नाही’, हे ४ वर्षांपासून माहीत असतांनाही आता संकल्पसभा घेऊन वेळ व्यर्थ घालवणारी विश्‍व हिंदु परिषद !
  • वर्ष २०१४ मध्ये सत्तेत येऊनही राममंदिर बांधण्याविषयी भाजपकडून काहीच हालचाल होत नाही, हे माहीत असतांनाही त्यावर विहिंप आणि भाजपचे सर्व खासदार यांच्याकडून त्वरित तोडगा न काढता आता निवडणुकांच्या काळात राममंदिराचा प्रश्‍न हाताळून विहिंप भाजपच्या वाटेनेच जात आहे, असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही.

नागपूर – भाजपच्या सत्तेला केवळ ६ मास आहेत आणि ६ मासांतही चमत्कार होतात. सरसंघचालकांनी रामजन्मभूमीसाठी कायदा करण्याचे सरकारला सांगितले आहे. त्यांचा शब्द हा ब्रह्मवाक्यासारखा असतो. या संदर्भात सर्व खासदारांच्या कार्यालयात संकल्प सभा होणार आहे, अशी माहिती विश्‍व हिंदु परिषदेचे प्रांत मंत्री अजय निलदावार यांनी २७ ऑक्टोबरला येथे दिली.

निलदावार पुढे म्हणाले, ‘‘देहली येथे झालेल्या विश्‍व हिंदु परिषदेच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीनंतर रामजन्मभूमीच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे येत्या डिसेंबर मासाच्या अखेर सर्व खासदारांच्या मुख्यालयात संकल्प सभा घेण्याचे आणि स्थानिक खासदाराला माहिती देण्याचे कार्यक्रम राबवले जातील. रामजन्मभूमी सूत्रावर संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, विश्‍व हिंदु परिषदचे राष्ट्रीय सचिव आणि कार्याध्यक्ष यांच्यात चर्चा झाली आहे. सरसंघचालकांचा शब्द हा प्रमाण असून निर्णय योग्य लागेल, अशी अपेक्षा आम्ही करतो, तसेच रामजन्मभूमीचा निर्णय आमच्या वतीने न झाल्यास, तर वरून आदेश आल्यास १९९२ सारखे आंदोलन करण्यासही आम्ही सिद्ध असल्याची चेतावणी त्यांनी या वेळी दिली.


Multi Language |Offline reading | PDF