पंजाबच्या सीमेवर २ पाकिस्तानी घुसखोरांना सीमा सुरक्षा दलाकडून अटक

पाकिस्तानी घुसखोर आणि पाकिस्तानी हेर यांच्यावर वचक बसवणारी कारवाई गेल्या ७१ वर्षांत एकाही सरकारने न केल्याने अशा घटना पुनःपुन्हा घडतात ! अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने यापेक्षा दुसरी गंभीर गोष्ट कुठली असू शकेल ? आतापर्यंतच्या शासनकर्त्यांसाठी हे लज्जास्पद आहे !

फिरोजपूर (पंजाब) – सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पंजाबच्या फिरोजपूर सीमेवरून दोघा पाकिस्तानी घुसखोरांना अटक केली. सीमेवर गस्तीसाठी असणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांना दोघे पाकिस्तानी घुसखोर भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत असल्याचे आढळून आले. त्या वेळी सैन्याने ही कारवाई केली. त्यांच्याकडे पाकिस्तानी सैन्याची ओळखपत्रे, पाकिस्तानी चलन, २ भ्रमणभाष, २ सीमकार्ड आदी साहित्य सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे. या दोघांचीही कसून चौकशी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF