मुसलमान काँग्रेसला एकगठ्ठा मतदान करू शकतात, तर हिंदू भाजपला का करू शकत नाही ? – भाजपचे राजस्थानमधील नेते धनसिंह रावत

  • ‘काँग्रेस मुसलमानांचे हित साधू शकते, तर भाजप हिंदूंचे हित का साधू शकत नाही ?’, याचे उत्तर प्रथम भाजपच्या नेत्यांनी दिले पाहिजे !
  • भाजपने वेळोवेळी हिंदूंच्या बाजूने उभे राहून हिंदूहित साधले असते, तर असे केविलवाणे आवाहन करण्याची वेळ सत्ताधारी भाजपवर ओढवली नसती !
  • ‘भाजपच्या बाजूने हिंदूंनी उभे रहावे’, असे वाटणार्‍या भाजपवाल्यांनी ‘भाजपने गेल्या साडेचार वर्षांत राममंदिर, कलम ३७०, गोहत्याबंदी कायदा आदी हिंदूंना दिलेल्या आश्‍वासनांपैकी अशी किती आश्‍वासने पाळली आहेत’, हे स्पष्ट करावे !

जयपूर (राजस्थान) – सर्व मुसलमान जर काँग्रेसला मतदान करू शकतात, तर हिंदू संघटित होऊन भाजपला का मते देऊ शकत नाहीत ?, असा प्रश्‍न राजस्थानमधील सत्ताधारी भाजपचे नेते तथा राज्यमंत्री धनसिंह रावत यांनी उपस्थित केला. (लोकसभेच्या निवडणुकीत हिंदूंनी भाजपला प्रचंड बहुमताने विजयी केले, हे भाजपचे नेते विसरले का ? हिंदू भाजपला मते देतात; पण भाजप भ्रमनिरास करतो, हा इतिहास आहे ! – संपादक) ते पुढे म्हणाले, ‘‘काँग्रेसचा अर्थच ‘मुसलमान’ असा आहे. प्रत्येक मुसलमानाने काँग्रेसला मतदान केले आहे. राजस्थानमध्ये जितके हिंदू आहेत त्यांनी एकत्र येऊन भाजपला मतदान केले पाहिजे.’’ (असे हिंदूंना आवाहन करण्याचा नैतिक अधिकार भाजपवाल्यांना आहे का ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now