आयएस्आयचा अटकेतील हेर करत होता ५ वर्षांपासून हेरगिरी !

५ वर्षांपासून हेरगिरी करूनही त्याचा थांगपत्ता भारतीय गुप्तचर यंत्रणांना लागू नये, हे लज्जास्पद ! देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने यापेक्षा गंभीर गोष्ट ती कुठली असू शकेल ?

  • आजपर्यंत अटक केलेल्या किती हेरांवर भारतातील सरकारांनी कठोर कारवाई केली ? इतरांवर वचक बसेल अशी कारवाई केली असती, तर अशी नामुष्की ओढवली नसती !
  • काँग्रेसच्या राजवटीत ज्या बातम्या वाचायला मिळत होत्या, त्याच भाजपच्या राजवटीत वाचायला मिळत असतील, तर भाजप आणि काँग्रेस यांच्या राजवटीत भेद तो काय ?

लक्ष्मणपुरी (लखनौ) – भारतीय सैनिकांच्या छावण्यांची माहिती, महत्त्वाचे नकाशे आणि गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवणार्‍या एका आयएस्आय हेराच्या आतंकवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी बुलंदशहर येथून मुसक्या आवळल्या. महंमद जाहिद असे या हेराचे नाव असून त्याच्याकडून संशयास्पद दस्तावेज, मेरठमधील सैन्याच्या छावण्यांचे नकाशे, आधारकार्ड, भ्रमणभाष, मतदान ओळखपत्र, तसेच इतर साहित्य जप्त केले आहे. सध्या या हेराची उत्तरप्रदेशमधील आतंकवादविरोधी पथक आणि गुप्तचर यंत्रणा यांच्याकडून कसून चौकशी केली जात असून त्यात अनेक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. महंमद हा गेल्या ५ वर्षांपासून देशातील संरक्षणाविषयीची गोपनीय माहिती, नकाशे, छायाचित्रे आदी पाकिस्तानातील आयएस्आयचा कमांडर अली याला पाठवत होता, तसेच तो भ्रमणभाषवरून अलीच्या संपर्कातही होता. जाहिदच्या २ मावशी कराचीमध्ये रहात असून तो प्रथम वर्ष २०१२ मध्ये आणि नंतर वर्ष २०१४ मध्ये पाकिस्तानला जाऊन आला होता. पहिल्या फेरीतच तो आयएस्आयच्या संपर्कात आला होता. तेव्हापासून त्याने हेरगिरी चालू केली होती.


Multi Language |Offline reading | PDF