डाव्यांचे सरकार नास्तिक असल्याने ते शबरीमला मंदिर उद्ध्वस्त करील ! – भाजप

भाविकांच्या अटकेच्या विरोधात भाजप ३० ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन करणार

  • भाजपला खरोखरंच जर भाविकांच्या बाजूने उभे रहायचे असेल, तर हाती सत्ता असतांना तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात अध्यादेश काढून न्यायालयाचा निर्णय फिरवत का नाही ?
  • केरळमध्ये श्री अय्यप्पा स्वामींच्या भक्तांनी धर्मशास्त्राच्या बाजूने ठामपणे उभे रहात स्वतः आंदोलन केले आहे ! ‘आता हे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर भाजप त्याचे श्रेय घेऊ पहात आहे’, असे कोणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ?
  • भाजपचे मंदिरप्रेम राज्यांप्रमाणे कसे पालटते ? महाराष्ट्रात शनिशिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या बाजूने भाजप उभी रहाते, तर केरळमध्ये सर्व वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याच्या सूत्राला विरोध करते ! हा भाजपचा दुटप्पीपणा नव्हे का ?
पी.एस्. श्रीधरन् पिल्लई

थिरुवनंतपूरम् – डाव्यांचे सरकार नास्तिक असून ते शबरीमला मंदिर उद्ध्वस्त करतील, अशी टीका भाजपचे केरळचे प्रदेशाध्यक्ष पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी केरळ सरकारवर केली.

ते पुढे म्हणाले, ‘‘सरकारने ३ सहस्रांहून अधिक भाविकांना अटक करून त्यांचे दमन करण्याचा प्रयत्न केला. शबरीमला मंदिराच्या रूढी आणि परंपरा यांचे जतन करण्याची भाविकांची मागणी आहे आणि ती योग्य असल्याने भाजप या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. हे आंदोलन चालूच ठेवण्याचा आमचा निर्धार आहे. भाविकांना पाठिंबा देण्यासाठी, तसेच केरळ सरकारचा निषेध करण्यासाठी ३० ऑक्टोबरला भाजपकडून राज्याव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. याशिवाय ८ नोव्हेंबरला कासरगोड ते शबरीमलापर्यंत रथयात्रा काढण्यात येणार आहे.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now