शीव रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे वसतीगृह आणि रुग्णांसाठीच्या वार्ड इमारतीमध्ये पाणी शुद्धीकरणाची व्यवस्था नाही ! – मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. हर्षलकुमार महाजन

२ वर्षे पाठपुरावा करूनही डॉक्टरांच्या मूलभूत आवश्यकता पूर्ण न करणारे असंवेदनशील रुग्णालय प्रशासन ! असे रुग्णालय रुग्णांना कसे हाताळत असेल, याचा विचारच न केलेला बरा !

मुंबई – शीव रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या ५ मजली वसतीगृहात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. पाणी शुद्धीकरणाची सुविधा बंद असल्याने डॉक्टरांना बाहेरून पिण्याचे पाणी आणावे लागते. गेल्या २ वर्षांपासून पाठपुरावा करूनही रुग्णालय प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. येथे २११ डॉक्टर वास्तव्यास आहेत. रुग्णांना भरती करण्यात येणार्‍या वार्ड इमारतीमध्येही पाणी शुद्धीकरणाची व्यवस्था उपलब्ध नाही. २५ वार्ड असलेल्या इमारतीमध्ये रुग्णासमवेत असणार्‍या नातेवाइकांना बाहेरून पाणी विकत घ्यावे लागते किंवा अन्य इमारतीमधून आणावे लागते. रुग्णालयाच्या आवारात मोजक्याच ठिकाणी पाणी शुद्धीकरण आणि थंड पाण्याची (कूलर) व्यवस्था उपलब्ध असल्याने डॉक्टरांसह रुग्णांच्या नातेवाइकांचेही हाल होतात, असा आरोप शीव रुग्णालयातील मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. हर्षलकुमार महाजन यांनी केला आहे.

निवासी डॉक्टरांच्या इमारतीमधील पाणी शुद्धीकरणाच्या दुरुस्तीसाठीचे काम लवकरच चालू करण्यात येणार आहे. वार्ड इमारतीमध्ये प्रत्येक वार्डमध्ये पाणी शुद्धीकरणाची व्यवस्था उपलब्ध असल्याचे शीव रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांनी सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now