नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात ४ सैनिक हुतात्मा

नक्षलग्रस्त भारत !

नक्षलवाद्यांचे उच्चाटन न करून सैनिकांना त्यांच्या हातून मरू देणारे भाजपचे कणाहीन शासनकर्ते राष्ट्रहित काय साधणार ?

रायपूर (छत्तीसगड) – येथील नक्षलग्रस्त विजापूर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४ सैनिक हुतात्मा झाले. याशिवाय २ सैनिक गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून हा स्फोट घडवून आणणार्‍या नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात आहे. (नक्षलवाद आणि आतंकवाद यांच्या उच्चाटनासाठी आजपर्यंत सहस्रो कोटी रुपये व्यय (खर्च) करूनही त्यांचा बीमोड होऊ न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद ! यास्तव आता हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक)

विजापूर येथून मुरदोंडाच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १६८ व्या बटालियनचे सैनिक गस्त घालत असतांनाच आवापल्ली येथे नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. घटनेची माहिती मिळताच केंद्रीय राखीव पोलीस दलाने आवापल्ली येथे अतिरिक्त कुमक पाठवली आहे. नक्षलग्रस्त विजापूर भागात १२ नोव्हेंबर या दिवशी विधानसभेसाठी मतदान होणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF