पाकिस्तान उद्ध्वस्त होऊन जगाच्या नकाशातून पुसून जाईल !

आप्पाचीवाडी कुर्ली येथील हालसिद्धनाथ यात्रेत पू. भगवान डोणे महाराज (वाघापूरे) यांची भाकणूक (भविष्यवाणी)

भाकणूक सांगतांना पू. भगवान डोणे महाराज आणि उपस्थित भाविक

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव), २८ ऑक्टोबर (वार्ता.) – जाती धर्म बिघडत जाईल, जातीधर्मात वैरत्व वाढेल. हाणामार्‍या होतील. पाकिस्तान राष्ट्राशी लढत रहातील. पाकिस्तान राष्ट्राचा चौथाई कोना भारताच्या ताब्यात येईल. भारतमातेचा तिथ जयजयकार चालल. शेतकरीवर्ग रात्रंदिवस काबाडकष्ट करतील, दुभत काढून डेअरील घालतील, डेअरीचा मालक मलई खाईल. दूध घालणारा शेवटी कर्जात राहील. चीन राष्ट्र हल्ला करल, भारत पाक बॉन्ड्रीवर रण होइल. आया बहिणींची अब्रू लुटतील, कानान ऐकशीला-डोळ्यांन बघशिला, पाकिस्तान राष्ट्र उद्धस्त होईल. जगाच्या नकाशातून पुसून जाईल. भाऊ बहिणच प्रेम प्रकरण चालल, प्रेम प्रकरणातून लग्नकार्य होतील.

भाऊ-बहिणीच्या सख्या नात्याला कलंक लागल, काळीमा फासल, अशी राष्ट्र-धर्म यांची भीषण स्थिती दर्शवणारी भाकणूक येथील श्री हालसिद्धनाथ मंदिरात २८ ऑक्टोबर या दिवशी पहाटे ४.२० वाजता पू. भगवान डोणे (वाघापुरे) यांच्या माध्यमातून सांगण्यात आली.

ही भाकणूक म्हणजे श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य होय. भाकणूक म्हणजे आगामी घडणार्‍या गोष्टी किंवा घटना गेय स्वरूपात (विशिष्ट भाषेत) श्री भगवान डोणे (वाघापुरे) यांच्या माध्यमातून श्री हालसिद्धनाथ देव सांगतात. या वेळी आप्पाचीवाडी, कुर्ली, रायबाग, चिक्कोडी, निपाणी, संकेश्‍वर, कोल्हापूर आदी गावांतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF