(म्हणे) ‘फाळणीसाठी भारतीय नागरिकही उत्तरदायी !’ – माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी

अशा धर्मांध वृत्तीच्या व्यक्तीने भारताचे उपराष्ट्रपतीपद भूषवले, हे लोकशाहीचे अपयश होय ! अशा पाकधार्जिण्या आणि इतिहासद्रोही व्यक्तीच्या सर्व सरकारी सुविधा काढून का घेतल्या जात नाहीत ? काँग्रेस कशा मानसिकतेच्या लोकांना पदे देत होती, हे लक्षात घ्या !

नवी देहली – भारताच्या फाळणीला जेवढे पाकिस्तानी उत्तरदायी आहेत, तेवढेच भारतीय नागरिकही उत्तरदायी आहेत; मात्र आपल्याकडे ‘ब्रिटीश आणि पाकिस्तानातील मुसलमान फाळणीसाठी उत्तरदायी आहेत’, असा समज आहे. (भारतातील हिंदू फाळणीच्या विरोधात होते; मात्र जिना यांनी धर्मांधांकरवी भारतात हिंदूंचा रक्तपात घडवून फाळणीचा निर्णय घेण्यास भाग पाडले. हा इतिहास असतांना हिंदूंना त्यासाठी दोषी ठरणारे अन्सारी यांच्यावर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक) भारत स्वतंत्र झाल्यावर देशाचे राजकारण पालटत गेले, तसे देशाच्या फाळणीसाठी केवळ मुसलमानांनाच उत्तरदायी धरले गेले, असे वादग्रस्त वक्तव्य भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी एका कार्यक्रमात केले. हमीद अन्सारी हे उपराष्ट्रपतीपदावरून पायउतार झाल्यापासून वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी ‘भारतातील मुसलमान असुरक्षित आहेत’, असे वक्तव्य केले होते. यावरून त्यांच्यावर टीकाही झाली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now