अमेरिकेत ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळात गोळीबार : ११ जण ठार

अमेरिका इतर देशांच्या अंतर्गत व्यवहारात नाक खूपसून तेथील मानवाधिकारांच्या हननाविषयी तेथील देशांना फुकाचा सल्ला देते; मात्र स्वतःच्या देशातील नागरिकांमध्ये वाढत चाललेल्या वर्णद्वेषी आणि पंथद्वेषी भावनेविषयी काहीही करत नाही !

पीटर्सबर्ग – येथील स्क्विरल हिल परिसरामधील ‘ट्री ऑफ द हिल’ या ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळावर रॉबर्ट बॉवर्स (वय ४६ वर्षे) याने केलेल्या बेछूट गोळीबारात ११ जण ठार, तर ६ जण घायाळ झाले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन आरोपीला पकडले. या प्रार्थनास्थळामध्ये ज्यू धर्मीय प्रत्येक शनिवारी ‘सब्बाथच्या प्रार्थने’साठी एकत्र येतात. येथे प्रार्थना चालू असतांना आरोपीने प्रवेश करून ‘सगळे ज्यू मरायलाच हवेत’, असे ओरडत उपस्थितांवर गोळीबार केला.


Multi Language |Offline reading | PDF