पाकने हाफिज सईदच्या आतंकवादी संघटनांवरील बंदी उठवली !

  • यावरून पाक आतंकवादाच्या निःपातासाठी किती गंभीर आहे, हेच सिद्ध होते !
  • देशावर आक्रमण करणार्‍या शत्रूच्या संघटनांवरील बंदी उठवणार्‍या विश्‍वासघातकी पाकशी भारतीय शासनकर्ते अजूनही मैत्रीची स्वप्ने पहातात, हे विशेष !
  • मुंबईवरील आक्रमणाला ११ वर्षे होऊनही अद्यापही या आक्रमणाचा सूत्रधार हाफिज सईदच्या मुसक्या आवळू न शकणे, हे आतापर्यंतच्या भारतीय शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद !

इस्लामाबाद – पाकमधील नवनियुक्त इम्रान खान सरकारने मुंबईच्या २६/११ च्या आक्रमणातील जिहादी आतंकवादी हाफिज सईद याच्या ‘जमाद-उद-दावा’ आणि ‘फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन’ या आतंकवादी संघटनांवरील बंदी उठवली. विशेष म्हणजे या दोन्ही संघटना संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या काळ्या सूचीत आहेत. त्यामुळे पाकचे माजी राष्ट्रपती मनून हुसैन यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये एक अध्यादेश काढून हाफिज सईदच्या या संघटनांवर बंदी आणून त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.

राष्ट्रपतींच्या या निर्णयाला सईदने इस्लामाबाद न्यायालयात आव्हान दिले होते. इम्रान खान सरकारने या अध्यादेशाची कार्यवाही न कल्याने तो अवैध ठरत असल्याचा आरोप सईदच्या अधिवक्त्यांनी न्यायालयात केला. हा अध्यादेश पाकिस्तानची एकात्मता आणि संविधान यांच्या विरोधी असल्याचा कांगावाही त्याने केला. त्यानंतर इम्रान खान सरकारने या संघटनांवरील बंदी उठवली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now