बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन यांच्या निवासस्थानी, तर बराक ओबामा यांच्या कार्यालयात बॉम्ब आढळल्याने खळबळ

न्यूयॉर्क – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या घरी, तर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वॉशिंग्टन येथील कार्यालयातही बॉम्ब आढळून आल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले. सुरक्षायंत्रणांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे अमेरिकेत एकच खळबळ उडाली. हे बॉम्ब ‘पार्सल’द्वारे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF