(म्हणे) ‘मित्रपक्ष एम्.आय.एम्.प्रमाणे आमचाही ‘वन्दे मातरम्’ला विरोध !’ – अधिवक्ता प्रकाश आंबेडकर

ज्या ‘वन्दे मातरम्’चा उद्घोष करत आणि त्यातून स्फूर्ती घेऊन क्रांतीकारकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या ‘वन्दे मातरम्’ला विरोध करणारे या देशाशी एकनिष्ठ राहू शकणार का ? असंगाशी संगाचे हे परिणाम समजायचे का ?

परभणी – राष्ट्रगीत म्हणणारे सर्वच जण भारतीय आहेत. त्यामुळे मित्रपक्ष एम्.आय.एम्.प्रमाणे ‘वन्दे मातरम्’ला आमचाही विरोध आहे, असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी परभणीमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. अधिवक्ता प्रकाश आंबेडकर हे मातंग समाज सत्ता संपादन परिषदेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणीमध्ये आले होते. या वेळी खासदार असदुद्दीन ओवैसींच्या ‘एम्.आय.एम्.’चा ‘वन्दे मातरम्’ला विरोध आहे, तर त्या संदर्भात तुमची भूमिका काय ?, असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्‍नाला उत्तर देतांना त्यांनी हे वक्तव्य केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या चारही मोठ्या पक्षांची मानसिकता वर्चस्ववादी असल्याचे आरोप अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी केला.

 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now