गोरेगाव (मुंबई) येथे आजपासून १०० कुण्डीय श्री गणेश महालक्ष्मी महायज्ञाला प्रारंभ

मुंबई, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – स्वामी करपात्री फाऊंडेशनद्वारा यज्ञसम्राट वीरव्रती श्री प्रबलजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव (पश्‍चिम) येथील बांगुरनगर, विष्णु पार्क येथे विश्‍वकल्याणार्थ १०० कुण्डीय श्री गणेश महालक्ष्मी महायज्ञ आणि श्रीमद् वाल्मिकी रामकथा यांचे आयोजन करण्यात आले आहे. २४ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत हा महायज्ञ होणार आहे. या कार्यक्रमाला प.पू. वीतराग श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज आणि प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज यांची वंदनीय उपस्थित लाभणार आहे.

२४ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ४ वाजता येथील बांगड सेवा सदन ते विष्णुपार्क येथील यज्ञस्थळापर्यंत विशाल कलशयात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता रासलीलेचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या कालावधीत नियमित दुपारी ३ वाजता रामकथा आणि सायंकाळी ६ वाजता महाआरती होणार आहे. या सोहळ्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री गणेश महालक्ष्मी महायज्ञ समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सनातनने प्रकाशित केलेल्या विविधांगी ग्रंथांचे प्रदर्शन !

यज्ञस्थळी सनातन संस्थेने प्रकाशित केलेले राष्ट्र, धर्म, अध्यात्म, आयुर्वेद, सण-उत्सव आदी विविधांगी ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. हे अनमोल ग्रंथ जिज्ञासूंना खरेदी करता येणार आहेत. तसेच सनातनची सात्त्विक उत्पादनेही येथे उपलब्ध असणार आहेत. धर्मशिक्षणाची माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शनही यज्ञस्थळी असणार आहे.

यासह नियमित सायंकाळी ६ वाजल्यानंतर व्यक्तीमत्त्व विकास, धर्माचरण, हिंदु संस्कृतीचे पालन आदी विविध विषयांवर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now