गोंडा (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून श्री दुर्गामूर्तीच्या मिरवणुकीवर दगडफेक

जिल्हाधिकारी, पोलीस यांच्यासह अनेक भाविक घायाळ

  • ‘उद्दाम धर्मांधांवर वचक न बसवता त्यांचा मार खाणारे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना हीच शिक्षा योग्य आहे’, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? असे प्रशासन जनतेचे रक्षण कसे करणार ?
  • काँग्रेसप्रमाणे भाजपच्याही राजवटीत हिंदूंच्या मिरवणुका सुरळीतपणे निघू शकत नसतील, तर काँग्रेस आणि भाजप यांच्या राजवटीत भेद तो काय उरतो ? अशा राजवटीचा हिंदूंना काय उपयोग ?

 

(प्रतिकात्मक चित्र)

गोंडा (उत्तरप्रदेश) – येथील कटारा बाजार येथे धर्मांधांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत जिल्हाधिकारी, पोलीस यांच्यासह अनेक भाविक घायाळ झाले. (धर्मांधांच्या दगडफेकीत पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घायाळ होतात, हे लज्जास्पद ! धर्मांध आता पोलीस आणि प्रशासन यांना जुमानत नाही, हेच यातून लक्षात येते ! – संपादक) या सर्वांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेनंतर अनेक भाविक दुर्गामूर्ती जागेवरच सोडून निघून गेले. यानंतर प्रशासनाने त्या मूर्ती विसर्जित केल्या.

पोलीस अधीक्षक लल्लन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार बराव गाव येथे प्रथमच श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. या मूर्तीची विसर्जन मिरवणूक एका ‘अल्पसंख्यबहुल’ (!) वस्तीतून नेण्याच्या भाविकांच्या निर्णयावर एका गटाने (धर्मांधांनी) आक्षेप घेतला. यामुळे २० ऑक्टोबरला रात्री दोन्ही गटांत मोठ्या प्रमाणात वादावादी घाली. मध्यरात्री दोन्ही बाजूंकडील लोक मोठ्या प्रमाणात एकत्र आले अन् ते एकमेकांसमोर उभे ठाकले.

हे कळताच मंडल आयुक्त सुदेशकुमार ओझा, जिल्हाधिकारी कॅप्टन प्रभांशु श्रीवास्तव आणि पोलीस उपमहानिरीक्षक अनिलकुमार राय यांनी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. या अधिकार्‍यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना त्यात यश आले नाही. धर्मांधांनी कर्नलगंज-हुजूरपुर हा मार्ग रोखून धरला. या वेळी आजूबाजूच्या गावातील लोकांनीही हिंदूंना पाठिंबा दिला. तथापि परिस्थिती बिघडत चालल्याने अनेक ठिकाणांहून येथे मूर्ती घेऊन येणारे भाविक रस्त्यातच थांबले अन् ते मूर्ती जागेवरच सोडून मागे फिरले. यानंतर प्रशासनाने तडकाफडकी या मूर्तींचे विसर्जन केले. त्यामुळे परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला. शेवटी पोलिसांनी दगडफेक करणार्‍यांवर बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. भाविकांनी ‘पोलिसांनी आम्हाला सार्वजनिक ठिकाणाहून जाऊ दिले नाही’, असा आरोप केला.

(संदर्भ : ‘जनसत्ता’ वृत्तसंकेतस्थळ)

लोकांना घराबाहेर पडून रस्त्यावर एकत्र येण्याचे मशिदीतून आवाहन !

‘या घटनेच्या वेळी मशिदींच्या माध्यमातून त्यांच्या समाजातील लोकांना घराच्या बाहेर पडून रस्त्यावर एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत होते’, असे वृत्त ‘जनसत्ता’ या वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे. (मशिदीतून असे आवाहन करणार्‍यांवर कारवाई का होत नाही ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF