१४ सहस्र लाडूंची अवैधपणे विक्री !

तिरुपती बालाजी मंदिरात लाडू घोटाळा

मंदिर  सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! सरकारच्या सर्व खात्यांत भ्रष्टाचार चालतो. सरकारच्या दृष्टीने अन्य सरकारी खात्यांप्रमाणे मंदिर हेही एक खाते असते आणि सरकार मंदिराचाही कारभार त्याप्रमाणेच हाकते. त्यामुळेच मंदिरांतही भ्रष्टाचार होतो. एकूणच मंदिरांचे सरकारीकरण ही शासनकर्त्यांसाठी पर्वणी, तर हिंदूंसाठी धर्महानी असते. ती रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

चेन्नई – नवरात्रीनिमित्त तिरुपती बालाजीच्या मंदिरात प्रसाद म्हणून ठेवण्यात आलेल्या १४ सहस्र लाडवांच्या विक्रीत घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. नवरात्रीच्या निमित्ताने भाविकांसाठी लाडवांचा प्रसाद ठेवण्यात आला होता आणि त्यासाठी १०० रुपये आणि ५० रुपयांचे कुपनही देण्यात आले होते. विक्रेते भाविकांकडून ‘कुपन’ घेऊन त्यांना लाडू देत होते; मात्र काही विक्रेत्यांनी ‘कुपन’च्या ‘झेरॉक्स’ प्रती काढल्या आणि मंदिराच्या बाहेर लाडू दुप्पट मूल्याला विकले. मंदिर समितीने या प्रकाराची चौकशी केली असता त्यात अनुमाने १४ सहस्र लाडवांची अफरातफर झाल्याचे उघड झाले.


Multi Language |Offline reading | PDF