काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

२ सैनिक गंभीररित्या घायाळ

आतंकवादग्रस्त भारत !

श्रीनगर – कुलगाम जिल्ह्यातील लारनू येथे २१ ऑक्टोबरला पहाटे सुरक्षादलाचे सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ३ आतंकवादी ठार झाले. ही चकमक तब्बल ५ घंटे चालली. या चकमकीत २ सैनिक गंभीररित्या घायाळ झाले. त्यांपैकी एका सैनिकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

लारनू येथे काही आतंकवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली. त्यानंतर सुरक्षादलाचे सैनिक आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी या संपूर्ण परिसराला घेराव घातला. या वेळी आतंकवाद्यांनी सैनिकांवर अचानक गोळीबार करणे चालू केले. त्याला प्रत्युत्तरादाखल सैनिकांनीही गोळीबार केला. यात २ सैनिकांना गोळी लागल्याने त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर सैनिकांनी आक्रमक कारवाई करत ३ आतंकवाद्यांना ठार केले. सुरक्षादलाच्या माहितीनुसार या परिसरात आणखी ४ – ५ आतंकवादी लपून बसले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कुलगाममधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF