बलात्काराच्या प्रकरणी केरळमधील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्या विरोधात गुन्हा नोंद

गुंड, भ्रष्टाचारी, बलात्कारी, देशद्रोही आणि धर्मद्रोही यांचा भरणा असलेल्या काँग्रेसवर बंदी घालण्याची मागणी आता जनतेने केली पाहिजे !

थिरुवनंतपूरम् – अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी केरळ पोलिसांकडून राज्यातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. वर्ष २०१३ मध्ये चंडी यांनी बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका पीडित महिलेने केला होता.

‘द हिंदू’च्या वृत्तानुसार पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या व्यवसायाला लाभ मिळवून देण्याच्या आमिषाने चंडी यांनी तिच्यावर अत्याचार केले. सौर ऊर्जा प्रकल्प गुंतवणूकप्रकरणी फसवणुकीचा आरोप असलेल्या महिलेने थिरुवनंतपूरम् येथील मुख्यमंत्र्यांच्या ‘क्लिफ हाऊस’ या सरकारी निवासस्थानी हा प्रकार घडल्याचा आरोप केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF