बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा हिंदुत्वच हाती घेणार ! – उद्धव ठाकरे

राममंदिराचा केला पुन्हा उद्घोष !

नगर – शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्वाचे बाळकडू मला मिळाले आहे. मी हिंदु आहे आणि हिंदु म्हणूनच मरणार. बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा हिंदुत्वच हाती घेणार, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात भाषण केले.

श्री. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘गेली ३० वर्षे राममंदिराविषयी ऐकत आलो आहे. निवडणूक आली की, राममंदिर आठवते; मात्र राममंदिर बांधणार कधी ?’’ या वेळी श्री. ठाकरे यांनी विविध प्रलंबित कामांवरून भाजपवर टीका केली.


Multi Language |Offline reading | PDF