‘सिमला’ शहराचे ‘श्यामला’ असे नामकरण करणार !

चंडिगड – भाजपशासित हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या ‘सिमला’ या शहराचे नामकरण करून ते ‘श्यामला’ असे करण्यात येणार आहे. येथे श्यामलादेवीचे मंदिर आहे. त्यावरून ब्रिटिशांनी ‘सिमला’ असे संबोधण्यास आरंभ केला, असे सांगितले जाते. ‘राजधानीचे नाव पालटण्याच्या मागणीविषयी सरकार जनतेच्या भावना जाणून घेणार आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी दिली. यापूर्वी विश्‍व हिंदू परिषदेने ‘सिमला’ शहराचे नाव पालटण्याची मागणी केली होती; मात्र वर्ष २०१६ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी सिमला हे नाव जगभर प्रसिद्ध असल्याचे सांगत विहिंपची मागणी फेटाळून लावली होती. (काँग्रेसच्या अस्मिताशून्य नेत्यांकडून आणखी वेगळी अपेक्षा काय करणार ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now