सरकारने संसदेत कायदा पारित करून मंदिर निर्मितीचा मार्ग प्रशस्त करावा ! – सरसंघचालक डॉ. भागवत

गेली चार वर्षे हे संघाने सरकारला का सांगितले नाही ?

नागपूर – अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी देशातील कोट्यवधी लोकांची इच्छा आहे. मंदिर उभारणीच्या सर्व सकारात्मक प्रयत्नात संघाची भूमिका सहकार्याची आहे. अयोध्येत पूर्वी मंदिर होते, याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत; परंतु तरीही देशातील काही शक्ती न्यायालयात नवनवीन सूत्रे उपस्थित करून या संदर्भातील ठोस निर्णयाला पायबंद घालण्याच्या प्रयत्नात आहेत. देशाच्या आत्मसन्मानासाठी राम मंदिराची निर्मिती आवश्यक आहे. या संदर्भात हिंदु समाजाच्या धैर्याची परीक्षा पहाणे कुणासाठीही हितावह नाही. तेव्हा सरकारने संसदेत कायदा पारित करून मंदिर निर्मितीचा मार्ग प्रशस्त करावा, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विजयादशमी उत्सवासाठी येथील रेशीमबाग मैदानावर उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना केले.

शहरी नक्षलवादाचा घातकीपणा, कौटुंबिक संस्कारांची आवश्यकता, शबरीमला मंदिर, प्रशासनातील परिवर्तनाची आवश्यकता आणि आगामी निवडणुकांत १०० टक्के मतदान करण्याचे महत्त्व आदी सूत्रांवर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलले.


Multi Language |Offline reading | PDF