४ सहस्र ३६९ कोटी रुपयांच्या अनियमिततेसाठी एन्.डी.टी.व्ही.ला अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस

  • पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका वृत्तवाहिनीला अशा प्रकारे नोटीस बजावली जाते, हे गंभीर सूत्र आहे !
  • कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन प्राप्त होऊनही त्याविषयीचे सत्य लपवले !
  • समाजसुधारण्याचा ठेका घेतल्याचा आव आणणार्‍या अशा वृत्तवाहिन्यांचे खरे स्वरूप जनतेसमोर येणे आवश्यक !
  • या वृत्तवाहिन्यांना मिळालेले विदेशी चलन हे भारत आणि हिंदु धर्म यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी वापरले जाते का ?, याचेही अन्वेषण होणे आवश्यक !

नवी देहली – परकीय चलन कायद्याखाली एकूण ४ सहस्र ३६९ कोटी रुपयांच्या परकीय चलनाचा अनियमित वापर केल्याविषयी अंमलबजावणी संचालनालयाने (इडीने) एन्.डी.टी.व्ही.ला नोटीस बजावली आहे. एन्.डी.टी.व्ही.ने अवैधपणे १ सहस्र ६३७ कोटी रुपयांचे परकीय चलन भारतात आणले आणि २ सहस्र कोटी रुपयांची भारताबाहेर गुंतवणूक केल्याचे आढळून आले आहे. (सरकारने त्वरित या सर्व गोष्टींचे सखोल अन्वेषण करून सत्य जनतेपर्यंत पोहोचवावे ! – संपादक)

अंमलबजावणी संचालनालयाने ही नोटीस एन्.डी.टी.व्ही.चे प्रणव रॉय, सौ. राधिका रॉय, विक्रम चंद्र आणि इतर सहकारी यांना पाठवली आहे. याशिवाय परकीय चलन कायद्याचा भंग केल्याविषयी एन्.डी.टी.व्ही.शी संबंधित इतर ४ आस्थापनांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.

संबंधितांनी १ सहस्र ६३७ कोटी रुपयांचे परकीय चलन भारतात आणतांना केंद्र सरकारला ही रक्कम अल्प दाखवून शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मानहानीकारक वृत्तांकनाप्रकरणी रिलायन्स समूहाकडून एन्.डी.टी.व्ही. विरुद्ध १० सहस्र कोटी रुपयांचा दावा प्रविष्ट

नवी देहली – राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या मानहानीकारक वृत्तांकनाप्रकरणी रिलायन्स समूहाकडून एन्.डी.टी.व्ही. या वादग्रस्त वृत्तवाहिनीविरुद्ध कर्णावती येथील न्यायालयात १० सहस्र कोटी रुपयांचा खटला प्रविष्ट करण्यात आला आहे. या वृत्तवाहिनीने राफेल विमान खरेदी प्रकरणावरून ‘ट्रुथ व्हर्सेस हाईप’ (खर्‍या विरुद्ध खोटे) या नावाने एक कार्यक्रम प्रसारित केला होता. या कार्यक्रमावर आक्षेप घेत सदर खटला प्रविष्ट करण्यात आला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now