६० सहस्र भारतियांकडे आहे अमेरिकेचे ‘ग्रीन कार्ड’ (कायमस्वरूपी नागरिकत्व) !

वॉशिंग्टन – अमेरिकेचे ‘ग्रीन कार्ड’ (कायमस्वरूपी नागरिकत्व) मिळवण्यासाठी अर्ज केलेल्यांपैकी केवळ १० टक्के भारतियांना हे कार्ड मिळाल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. वर्ष २०१७ मध्ये सहा लाख भारतियांनी अमेरिकेतील कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज केला होता; परंतु त्यातील केवळ ६० सहस्र ३९४ भारतियांचे अर्ज स्वीकारले गेले, अशी माहिती उघड झाली आहे. यामध्ये ‘एच् वन बी व्हिसा’द्वारे अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या भारतियांचे प्रमाण सर्वाधिक आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील २३ सहस्र ५६९ भारतियांना अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळाले आहे.

१. अमेरिकेने ‘ग्रीन कार्ड’संबंधी नियमावली आखली असून त्यानुसार प्रत्येक देशातील अर्जदारांना विशिष्ट प्रमाणात कायमस्वरूपी नागरिकत्व देण्यात येते. यामुळे ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी किमान २५ ते कमाल ९२ वर्षांचा कालावधी लागू शकतो.

२. एप्रिल २०१८ पर्यंतच्या आकडेवारीनुसार ६ लाख ३२ सहस्र २१९ भारतीय ग्रीन कार्ड मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF