‘यू ट्यूब’ची सेवा १ घंट्यासाठी अचानक ठप्प !

न्यूयॉर्क – तांत्रिक बिघाडामुळे १७ ऑक्टोबरला सकाळी ‘यू ट्यूब’ची सेवा १ घंटा अचानक ठप्प झाली. अनपेक्षितपणे अणि प्रथमच घडलेल्या या घटनेमुळे ‘यू ट्यूब’चे वापरकर्ते बुचकाळ्यात पडले. ‘यू ट्यूब’ चालत नसल्याचे लक्षात येताच सहस्रो लोकांनी ‘यू ट्यूब’ ठप्प झाल्याचा ‘स्क्रीन शॉट’ ‘टि्वटर’वर प्रसारित केला. यावर ‘यू-ट्यूब’ने तात्काळ ‘समस्येवर उपाययोजना काढण्याचे काम चालू असून लवकरात लवकर ‘यू ट्यूब’ चालू होईल’, असे स्पष्टीकरण दिले.


Multi Language |Offline reading | PDF