पाक चीनकडून क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या सिद्धतेत !

कपटी पाक आणि धूर्त चीन यांच्या आव्हानाचा सामना सरकार कसा करणार आहे ?

इस्लामाबाद – पाक चीनकडून सिद्ध करण्यात आलेले ‘एचडी-१’ हे ‘सुपरसॉनिक’ क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या सिद्धतेत आहे. चीनचे हे नवे क्षेपणास्त्र भारताच्या ‘ब्राह्मोस’ या क्षेपणास्त्रापेक्षा अधिक क्षमतेचे असल्याचा दावा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चीनचे ‘एचडी-१ सुपरसॉनिक’ क्षेपणास्त्राला फारशा आव्हानांचा सामना करावा लागलेला नाही. चीनने या क्षेपणास्त्राची चाचणी मागील आठवड्यात देशातील उत्तर भागात गुप्तपणे केली होती. हे क्षेपणास्त्र विमान, जहाज आणि भूमी या तिन्हींवरून वापरले जाऊ शकते. तथापि ते किती अंतरापर्यंत मारा करू शकते, हे अद्याप चीनने उघड केलेले नाही.


Multi Language |Offline reading | PDF