खडकी (जिल्हा पुणे) येथील ४ सैनिकांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद

अशा घटनांमुळे ‘देशाच्या रक्षणकर्त्या सैनिकांमध्येही अधर्म फोफावला आहे’, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?

पुणे – खडकी येथील लष्करी रुग्णालयात काम करणार्‍या ४ सैनिकांनी मूकबधीर महिलेवर ४ वर्षे बलात्कार केल्याच्या प्रकरणी चौघांवर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बलात्कारानंतर महिलेने इंदूर येथील एका संस्थेचे तज्ञ ज्ञानेंद्र पुरोहित यांच्या साहाय्याने तक्रार दिली.

पीडित महिला खडकीतील लष्करी रुग्णालयात काम करते. आरोपींनी याच रुग्णालयात तिच्यावर अत्याचार केल्याचा उल्लेख प्रथम माहिती अहवालात आहे. खडकीतील लष्करी न्यायालयाने चारही आरोपींच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘बलात्कारानंतर २ सैनिकांनी आमच्यासमवेत शारीरिक संबंध न ठेवल्यास तुझे चलचित्र (व्हिडिओ) सर्वांना पाठवू’, अशी धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला. ‘या प्रकरणाची तक्रार वरिष्ठांकडे करूनही काहीच कारवाई झाली नाही’, असाही उल्लेख तक्रारीत आहे.


Multi Language |Offline reading | PDF