तमिळनाडूतील मंदिरातून १०० वर्षे प्राचीन मूर्तींची चोरी

वास्तविक अशा प्राचीन मूर्तींच्या रक्षणासाठी भारतातील पुरातत्व विभाग काय प्रयत्न करतो ? हिंदूंचा अमूल्य ठेवा असणार्‍या अशा मूर्तींचे रक्षण न केल्याने त्या आंतरराष्ट्रीय बाजारात विकल्या जातात. यास उत्तरदायी असणार्‍या पुरातत्व विभागातील संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक !

मदुराई (तमिळनाडू) – येथून जवळच असलेल्या कुरुविठूराई येथील चित्रराधा वल्लभ पेरूमल मंदिरातील १०० वर्षे प्राचीन श्री वल्लभ पेरूमल, श्री श्रीदेवी, श्री भूमादेवी आणि श्री श्रीनिवासागर या देवतांच्या पंचधातूच्या ४ मूर्ती १३ ऑक्टोबर या दिवशी रात्री अज्ञातांनी चोरल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक एन् मानिवन्नन् यांनी ही माहिती दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार चोरांना मंदिराच्या गुप्त दानाच्या हुंडीपर्यंत पोहोचता आले नाही. या मंदिराच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले ३ वयोवृद्ध रखवालदार मंदिराबाहेर झोपले असतांना ही चोरी झाली. रविवारी सकाळी मंदिर उघडल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. पोलिसांना सीसीटीव्ही वरून २ चोर रात्री १२.३० वाजता मंदिरात शिरल्याचे आढळून आले.


Multi Language |Offline reading | PDF