कर्जबुडव्या मेहूल चोकसीची २१८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

नवी देहली – पंजाब नॅशनल बँकेचे शेकडो कोटी रुपयांचे कर्ज बुडवणारे घोटाळेबाज मेहूल चोकसी यांची २१८ कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली. यापूर्वी नीरव मोदीसह त्यांचा भाऊ, तसेच त्यांचे अन्य ४ साथीदार यांची ६३७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. मेहूल चोकसी हे नीरव मोदी यांचे काका असून ते दोघे जण पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. सध्या ते दोघेही पसार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF