धर्मपरंपरांच्या रक्षणार्थ शबरीमला मंदिराच्या बाहेर निदर्शने करणार्‍या भाविकांवर पोलिसांकडून लाठीमार !

५० भाविक पोलिसांच्या कह्यात

  • हिंदूंच्या हत्या करणार्‍या साम्यवाद्यांच्या गुंडांना रोखू न शकणारे केरळ पोलीस हिंदु भाविकांवर मात्र मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या !
  • मूठभर निधर्मी (अधर्मी) लोक व्यवस्थेच्या आधारे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवतात आणि हिंदूंनी निवडून दिलेले सरकार हिंदूंची बाजूही घेत नाही, हा हिंदूंचा विश्‍वासघात आहे ! यावरून हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची अपरिहार्यता लक्षात घेऊन त्यासाठी प्रयत्न करावेत !
  • हिंदूंच्या शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून आकाश-पाताळ एक करणारे पुरो(अधो)गामी मशिदीत महिलांना प्रवेश नसण्याविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

थिरूवनंतपुरम् – शबरीमला मंदिरात १० ते ५० वयोगटांतील महिलांना प्रवेश न देण्याच्या धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी, तसेच न्यायालयाच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी असंख्य भाविकांनी मंदिराच्या बाहेर निदर्शने केली, तसेच मोर्चे काढले. या वेळी पोलिसांनी भाविकांवर लाठीमार केला, तसेच ५० भाविकांना कह्यात घेतले. यामुळे मंदिर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर १७ ऑक्टोबर या दिवशी हे मंदिर पारंपरिक मासिक पूजेसाठी उघडण्यात आले. मंदिराच्या परिसरात सरकारने पोलीसांचा प्रचंड फौजफाटा ठेवला होता. मंदिरापासून काही अंतरावर ‘शबरीमला आचार संरक्षण समिती’चे तंबूही पोलिसांनी काढून टाकले.

भाविक महिलांनी रस्त्यातील गाड्या अडवल्या !

शबरीमला मंदिरात ठराविक वयोगटातील महिलांनी प्रवेश करू नये, यासाठी अनेक महिला भाविक मंदिरापासून २० कि.मी. अंतरावर पारंपरिक पोशाखात रस्त्यावर उतरून मंदिराकडे जाणारे प्रत्येक वाहन थांबवत होत्या. त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्याही गाड्या अडवून त्यातील युवतींना उतरण्याचे आवाहन केले.

(म्हणे) शबरीमला मंदिराच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेणार नाही !’ – मुख्यमंत्री पिनराई विजयन्

काही भाविकांना शबरीमला मंदिरात येण्यापासून रोखले जात असल्याच्या सूत्रावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् म्हणाले, ‘‘भाविकांना रोखणार्‍यांवर सरकार कठोर कारवाई करील. कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही. आम्ही सर्व भाविकांना संरक्षण पुरवू. शबरीमला मंदिराच्या नावाखाली सरकार कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेणार नाही. (मुख्यमंत्र्यांनी ही भाषा कधी हिंदुत्वनिष्ठांची हत्या करणार्‍या डाव्यांविषयी का वापरली नाही ! – संपादक) राज्य सरकार न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात फेरविचार याचिका प्रविष्ट करणार नाही, तसेच सरकार मंदिरात जाण्यापासून कोणालाही अडवणार नाही. सर्व भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी सोयीसुविधा पुरवल्या जातील. सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करील.’’


Multi Language |Offline reading | PDF