परभणी येथे पोलिसांकडून श्री दुर्गामाता दौड बंद पाडण्याचा प्रयत्न !

  • हिंदु-मुसलमान तेढ निर्माण होत असल्याचा कांगावा

  • शिवसेनेचे आमदार आणि खासदार यांच्या विरोधानंतर पोलिसांनी घेतली माघार !

  • ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा करण्यासही पोलिसांकडून मनाई !

मोगलाईच्या दिवसांची आठवण करून देणारे परभणी येथील पोलीस ! हिंदूंच्या उत्सवात दौड काढल्यास हिंदु-मुसलमान तेढ निर्माण होत असेल, तर भारताचा पाकिस्तान झाला आहे, असेच बहुसंख्य हिंदूंना वाटते. ही भयावह स्थिती पहाता हिंदूंना विजयादशमीचे निमित्त साधून सीमोल्लंघन करावेच लागेल, हे निश्‍चित !

परभणी येथील दुर्गामाता दौडमध्ये सहभागी भगवा ध्वज हातात घेतलेले शिवसेनेचे खासदार श्री. संजय जाधव

परभणी – श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने अनेक वर्षांपासून नवरात्र महोत्सवाच्या अंतर्गत चालू असलेल्या श्री दुर्गामाता दौडला विरोध करून ती बंद करण्याचा प्रयत्न येथील नानलपेठ पोलिसांनी केला. दौड बंद पाडण्यासाठी पोलिसांनी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे धारकरी श्री. शंकर देशमुख यांना ‘तुम्हाला दौडसाठी अनुमती द्यायची आहे’, असे खोटे सांगून पोलीस ठाण्यात नेले; पण प्रत्यक्षात पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी ‘प्रतिदिन सकाळी दौड काढून तुम्ही हिंदु-मुसलमान यांच्यात तेढ निर्माण करत आहात’, असे म्हणत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा देण्यासही मनाई केली. (असे करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? – संपादक) शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पोलिसांच्या या भूमिकेचा कडाडून विरोध केल्यावर पोलिसांनी माघार घेतली. (शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी ‘जागृत हिंदू कसा असावा ?’, याचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. त्याविषयी त्यांचे अभिनंदन ! – संपादक)

#परभणी_नानलपेठ

त्यानुसार १७ ऑक्टोबर या दिवशी दौड उत्साहात पार पडली. या वेळी काही पोलीस उपस्थित होते.

१. १५ ऑक्टोबरला रात्री ११ वाजता पोलीस शंकर देशमुख यांच्या घरी आले आणि म्हणाले, ‘‘तुम्हाला दुर्गामाता दौडसाठी अनुमती द्यायची आहे, त्यासाठी पोलीस ठाणे येथे चला.’’ त्यानंतर शंकर जाधव यांना पोलीस घेऊन गेले.

२. त्यानंतर पोलिसांनी श्री. देशमुख यांची कोर्‍या कागदावर स्वाक्षरी आणि अंगठ्याचे ठसे घेतले. त्या कागदावर ‘मी माझ्या संमतीने दौड बंद करत आहे’, असे पोलिसांनी लिहून घेतले.

३. त्यानंतर पोलिसांनी श्री. शंकर यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या वेळी पोलिसांनी ‘तुला ६ मासांसाठी तडीपार करू, तसेच तुझ्या वडिलांचे निलंबन करू किंवा त्यांचे स्थानांतर (बदली) करू’, अशी धमकीही दिली.

४. हे प्रकरण येथील शिवसेना खासदार श्री. संजय जाधव यांना समजताच त्यांनी तातडीने नानलपेठ पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलिसांना जाब विचारले, तसेच शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनीही पोलीस ठाण्यात येऊन ‘दुर्गामाता दौडला पोलिसांनी आक्षेप घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल’, अशी चेतावणी दिली. त्यामुळे सर्व स्तरांतून विरोध होण्यास प्रारंभ झाल्यावर नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी माघार घेतली. आधी दौडला विरोध करणारे आणि दबाव आल्यावर माघार घेणारे पोलीस निरीक्षक गाडेकर म्हणाले, ‘‘दुर्गामाता दौडविषयी आम्हाला माहिती नव्हती, एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात तिचे आयोजन केले जाते हेही माहीत नव्हते. यापुढे दुर्गामाता दौडला कोणीही रोखणार नाही, आम्हाला क्षमा करा.’’ (हिंदूंना नाहक छळणारे पालीस हिंदूंनी जागृत होऊन जाब विचारल्यावर सरळसूद होतात ! – संपादक) यानंतर पोलिसांनी ‘दौडमध्ये फटाके वाजवू नयेत’, अशी अट घालून अनुमती पत्र दिले. (पोलीस अन्य धर्मियांना कधी अटी घालतात का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF