लैंगिक शोषणाचे आरोप झाल्याच्या प्रकरणात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम्.जे. अकबर यांचे त्यागपत्र

नवी देहली – लैंगिक शोषणाचा आरोप झालेले परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम्. जे. अकबर यांनी शेवटी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. त्यांच्यावर तब्बल १५ महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्यागपत्र देतांना केलेल्या निवेदनात अकबर म्हणाले, ‘‘माझ्यावरील आरोपांच्या विरोधात मी माझी बाजू व्यक्तीगतरित्या न्यायालयात मांडणार आहे. त्यासाठी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री या पदावरून पायउतार होणे सयुक्तिक असल्याचे मला वाटले.’’


Multi Language |Offline reading | PDF