उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील वारकरी संप्रदाय आणि संतमहंत श्रीराममंदिर उभारणीच्या कार्यात सहभागी होणार ! – ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज कोल्हापूरकर

  • अडवणूक करणार्‍यांना संत तुकाराम महाराजांच्या वचनानुसार प्रतिकार करण्याची चेतावणी

  • शिवसेनाच राममंदिर उभारू शकणार असल्याची निश्‍चिती !

राममंदिर उभारण्याची केवळ घोषणा करणार्‍या भाजप सरकारला याविषयी काय म्हणायचे आहे ?

ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज कोल्हापूरकर

पैठण – राममंदिर उभारणीचा विसर पडलेल्या भाजप सरकारवर आमचा विश्‍वास राहिला नाही. आता शिवसेनाच प्रभु श्रीरामाचे मंदिर उभारू शकते, यात तीळमात्र शंका नाही. विजयादशमीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा विभागातील वारकरी आणि संतमहंत हे अयोध्येत मंदिर उभारणीच्या कार्यात सहभागी होणार आहेत. आम्हाला कोणीही अडवण्याच्या भानगडीत पडू नये अन्यथा ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’, या संत तुकाराम महाराज यांच्या वचनाप्रमाणे प्रतिकार केला जाईल, अशी चेतावणी जागतिक वारकरी शिखर परिषद (मुंबई)चे अध्यक्ष तथा माऊली जन्मक्षेत्र आपेगाव (पैठण) येथील मंदिर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज कोल्हापूरकर यांनी दिली आहे. विदर्भ आणि मराठवाडा येथील अध्यात्मक्षेत्रातील मान्यवरांच्या बैठकीत ते बोलत होते.


Multi Language |Offline reading | PDF