पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली मेरठमधून एका सैनिकाला अटक !

आठवड्यातील दुसरी घटना !

  • युद्धाच्या वेळी असे घरभेदी कोणाच्या बाजूने असतील, हे वेगळे सांगायला नको. देशद्रोह्यांना चाप बसेल, असे पाऊल भाजप सरकार आता तरी उचलणार का ?                                                                                                                                              
  • यापूर्वी पाकचे हेर म्हणून अटक केलेल्या देशद्रोह्यांना सरकारने वेळीच जन्माची अद्दल घडवली असती, तर अशी देशद्रोही कृत्ये करू पहाणारे वठणीवर आले असते !                                                                                                                                               
  • सैनिकांमध्ये वावरणार्‍या फितुरांनाही ओळखू न शकणारे सैन्य छुप्या शत्रूंशी कसे लढणार ?

मेरठ (उत्तरप्रदेश) – पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली मेरठ कंटोनमेंटमधून एका सैनिकाला अटक करण्यात आली. सैन्याच्या ‘सिग्नल रेजिमेंट’मध्ये कार्यरत असलेल्या या सैनिकाची सध्या कसून चौकशी केली जात आहे. त्याचे नाव कांचन सिंह असून हा सैनिक उत्तराखंडमधील रहिवासी आहे. तो १० वर्षांपासून भारतीय सैन्यदलात कार्यरत आहे. तो गेल्या १० मासांपासून पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.शी संबंधित लोकांच्या संपर्कात होता. याशिवाय त्याचे पाकमधील भ्रमणभाष क्रमांकांवर संभाषण झाले आहे. त्याने ‘व्हॉट्सअ‍ॅप’द्वारे सैन्याची अनेक गोपनीय कागदपत्रे पाठवली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सैन्यदलाला या सैनिकाच्या कारवायांविषयी ३ मासांपूर्वीच सुगावा लागला होता. त्यानंतर त्याच्यावर सतत पाळत ठेवण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला पुरवल्याबद्दल अभियंता निशांत अग्रवाल याला अटक करण्यात आली होती. तो ‘ब्राह्मोस एरोस्पेस’मध्ये अभियंता म्हणून कार्यरत होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now