सार्वजनिक शौचालयांतील अपुर्‍या पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय

नागरिकांची कुचंबणा कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पालिका प्रशासन काय उपाययोजना करणार आहे ? केवळ सर्वत्र शौचालये बांधून उपयोग नाही, तर ती सुस्थितीत ठेवण्याचे व्यवस्थापनही कार्यरत ठेवायला हवे. देशाच्या विकासाच्या गोष्टी करणारे या मूलभूत सोयींचे व्यवस्थान कधी सुधारणार ?

मुंबई – गेल्या १०-१२ दिवसांपासून पुरेशा पाण्याअभावी नागरिकांना अनेक ठिकाणी तुंबलेल्या सार्वजनिक शौचालयांचा उपयोग करावा लागत आहे. शौचालयासाठी ‘पाणी हवे असेल, तर अधिक पैसे देणार का ?’, असा प्रश्‍न ‘पे अण्ड यूज’ प्रकारच्या सार्वजनिक शौचालयांचे ठेकेदार करत आहेत. शौचालयांचे ठेकेदार पाण्यासाठी अधिक पैसे आकारत असूनही अपुरे पाणी देत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिकेने शौचालयाच्या वापराचे शुल्क वाढवले नसल्याने तुटपुंज्या पैशांत व्यवस्थापन सांभाळता येत नसल्याचे ठेकेदारांनी म्हटले आहे.

सार्वजनिक शौचालयांतील पाण्याची उपलब्धता आणि गैरसोयी या सूत्रांकडे लक्ष दिले जात नसल्याची खंत ‘राइट टू पी’ या मोहिमेच्या समन्वयक सुप्रिया जान यांनी व्यक्त केली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now