आसाममधील बनावट चकमकीच्या प्रकरणात ७ सैन्याधिकार्‍यांंना जन्मठेप

सैन्य न्यायालयही २४ वर्षांनी बनावट सैन्याधिकार्‍यांनी केलेल्या बनावट चकमकीच्या प्रकरणात निकाल देते, हा पीडितांच्या कुटुंबियांवर अन्याय नव्हे का ?

गौहत्ती – वर्ष १९९४ मध्ये आसाममध्ये झालेल्या बनावट चकमकीच्या प्रकरणी सैन्य न्यायालयाने ७ सैन्याधिकार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या चकमकीत ५ युवक ठार झाले होते. सैन्याच्या मुख्यालयाकडून या वृत्ताला अजून दुजोरा मिळालेला नाही. या वृत्ताचा दुजोरा मिळण्यासाठी २- ३ मासांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिक्षा झालेल्यांमध्ये मेजर जनरल ए.के. लाल, कर्नल थॉमस मॅथ्यू, कर्नल आर्.एस्. सिबिरेन, कनिष्ठ कमिशंड अधिकारी आणि नॉनकमिशंड अधिकारी दिलीप सिंह, जगदेव सिंह, अलबिंदर सिंह आणि शिवेंदर सिंह यांचा समावेश आहे. हे सर्व दोषी अधिकारी या निर्णयाविरुद्ध ‘आर्म्ड फोर्सेज ट्रिब्यूनल’मध्ये, तसेच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now