भारतात २ लाख ५० सहस्र अवैध मदरशांना इस्लामी राष्ट्रांतून निधी प्राप्त !

  • २ लाख ५० सहस्र अवैध मदरशांची उभारणी होईपर्यंत भारतातील सुरक्षायंत्रणा झोपली होती का ?
  • मदरशांचे आधुनिकीकरण करण्याच्या नावाखाली त्यांना निधी पुरवण्याचा घाट घालणारे शासनकर्ते एक प्रकारे राष्ट्रविघातक कृतीच करत आहेत, हेच या माहितीवरून सिद्ध होते !
  • युरोपीय देशांना मशिदींमधून राष्ट्रविघातक कारवाया चालू असल्याचे लक्षात येताच, ते मशिदींना टाळे ठोकतात. तोच बाणा भारतीय शासनकर्ते मदरशांच्या संदर्भात दाखवतील का ?
हरियाणातील पलवल येथील मशीद

नवी देहली – भारतात आतंकवाद्यांकडून मिळणार्‍या निधीविषयी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा चौकशी करत आहे. हरियाणातील पलवल येथील मशीद बांधण्यासाठी लष्कर-ए-तोयबा निधी पुरवत असल्याचे समोर आले आहे. आता भारतातील सुमारे २ लाख ५० सहस्र नोंदणी नसलेल्या म्हणजे अवैध मदरशांना इस्लामी राष्ट्रांतून हवालाद्वारे निधी मिळत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सौदी अरेबिया, ओमान, कतार, दुबई आणि पाक या राष्ट्रांचा समावेश आहे. भारत-नेपाळ यांच्या सीमारेषेवर मदरशांच्या संख्येत वाढ झाली आहे. (सीमारेषेवर अशा प्रकारे कारवाया होत असतांना सुरक्षादले त्यांवर आळा का घालत नाहीत ? त्यांच्या उभारणीलाच म्हणजे पहिल्या टप्प्यातच या मदरशांना विरोध केला असता, तर आज त्यांच्या चौकशीसाठी सुरक्षायंत्रणांचा वेळ वाया गेला नसता ! – संपादक) त्यांचीही राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी होत आहे.

भारतात कट्टरवादी वहाबी पंथाच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी पाकमधील हवालाद्वारे निधी पुरवणारी यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे. (सतत भारतविरोधी कारवाया करणार्‍या पाकला कायमचा धडा शिकवल्यास भारताच्या अर्ध्या अधिक समस्या सुटतील ! – संपादक) मदरशांना निधी पुरवल्याच्या प्रकरणात देहलीतील लाजपतनगरमधील हिलाल अहमद राथर नावाच्या काश्मिरी व्यापार्‍याच्या घरावर पोलिसांनी अलीकडेच धाड टाकली. त्याच्या घरातून १८ लाख रुपये, ६ भ्रमणभाष आणि सीमकार्ड हस्तगत करण्यात आले. राजधानी देहलीतील काही मदरशांना अशा प्रकारे निधी मिळत असल्याची माहिती त्याच्याकडून मिळाली आहे. मागील मासात केरळमधील मरकज-उल-जामिया मदरशाची चौकशी करण्यात आली. त्यात ‘भारतातील अनेक मदरशांमध्ये वहाबी पंथाची कट्टरवादी शिकवण दिली जात आहे’, अशी माहिती पुढे आली आहे. भारतात अनुमाने ५ लाख मदरसे आहे. त्यांतील अडीच लाख मदरसे नोंदणीकृत नाहीत, अशी माहितीही पुढे आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF