(म्हणे) ‘रावणदहन करणार्‍यांवर गुन्हा प्रविष्ट करा !’

रावणाचे उदात्तीकरण करणार्‍या भीम आर्मीचे प्रशासनाला पत्र

मुंबई – रावण हा संगीततज्ञ, राजनीतीज्ञ, शिल्पकार, नीतीतज्ञ, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी इत्यादी अनेक गुणांचा आविष्कार असणारा राजा होता. प्रथेच्या नावाखाली कुणी रावणदहनासारखा प्रकार केल्यास आदिवासी संघटना आणि एकंदरीत समाजाच्या भावना तीव्र होतील. त्यामुळे जी मंडळी रावणदहन करतील, अशा लोकांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३,१५३ (अ), २९५ ,२९८, मुंबई पोलीस अ‍ॅक्ट १३१, १३४, १३५ नुसार फौजदारी गुन्हा नोंदवण्यात यावा, असे भीम आर्मीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आणि ठिकठिकाणी निवेदन देऊन आवाहन केले आहे. (विजयादशमीला सीमोल्लंघन करणे, सर्व दुष्प्रवृत्तींचे मूळ असलेल्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करणे, ही हिंदूंची सहस्रो वर्षांची परंपरा आहे. बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंच्या प्रथा-परंपरा मोडित काढण्याचा हा डाव आहे, हे न कळण्यास हिंदू दुधखुळे नाही ! त्यामुळे प्रशासनाने हिंदूंच्या धर्मश्रद्धांचे रक्षण करावे ! – संपादक)

या प्रसिद्धीपत्रकात पुढे नमूद केले आहे की,

१. तमिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरे आहेत. सर्वांत मोठी मूर्ती ही मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात मेळघाट तसेच छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि झारखंड येथे रावणाची पूजा केली जाते.

२. रावणाला जाळण्याची कुप्रथा आणि परंपरा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे.

३. त्यामुळे देशातील आदिवासी समाजासह जागृत झालेल्या जनतेच्या भावना दुखावल्या जातात. या दहन प्रथेमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. (हिंदू सहिष्णु असल्याने पर्यावरणाच्या नावाखाली हिंदूंना सण-उत्सव साजरे करण्यास प्रतिबंध करण्यात येतो. एरव्ही वर्षभर कारखान्यांद्वारे होणारे जल आणि वायू यांचे प्रदूषण, मशिदींवरील भोग्यांद्वारे होणारे ध्वनीप्रदूषण यांविरुद्ध कधी आवाज उठवला जातो का ? – संपादक)

४. रावणाच्या माहितीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now