पोलिसांनी महंत आणि पुजारी यांना प्रवेश रोखल्याने ऐन नवरात्रोत्सवात श्री भवानीदेवीच्या पूजेला अर्धा घंटा विलंब !

  • सरकारीकरण झालेल्या मंदिरांत होणारा धर्मद्रोह ! नवरात्रोत्सवात देवीच्या पूजेला विलंब होणे म्हणजे देवीची अवकृपाच ओढवून घेण्यासारखे आहे ! हा निंदनीय प्रकार हिंदूसंघटनाची अपरिहार्यता दर्शवतो !
  • अंतर्गत वादाचा परिणाम देवीच्या पूजनावर होऊ देणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – ऐन नवरात्रोत्सवात पोलिसांनी श्री भवानीदेवी मंदिरातील छत्रपती शिवाजी द्वार बंद केल्याने १५ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी देवीच्या अभिषेक पूजेला अर्धा घंटा विलंब झाला. कोणत्याही अडचणींचा विचार न करता या द्वारातून कोणालाही न सोडण्याचा आदेश पोलीस उपविभागीय अधिकारी घुगे यांनी अचानक दिला. ‘महसूल विभागाने श्री भवानीदेवीच्या दर्शनासाठी पोलिसांच्या कुटुंबियांना महनीय पास देऊन सोडणे बंद केल्याने महसूल आणि पोलीस यांच्यातील वादातून छत्रपती शिवाजी द्वार बंद केले असावे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. (मंदिराचे सरकारीकरण झाल्यावर असेच होणार ! ऐन नवरात्रोत्सवात पुजार्‍यांच्या अडचणी समजून न घेता मनमानी निर्णय घेणारे पोलीस हिंदुद्वेषीच होय ! – संपादक)

१. छत्रपती शिवाजी द्वार बंद केल्याने पोलिसांनी महंतांना मंदिरात येण्यास अडवले. हे कळताच पुजार्‍यांनी महंतांना मंदिरात प्रवेश देण्याची पोलिसांकडे विनंती केली; मात्र पोलिसांनी पुजार्‍यांचे ऐकले नाही.

२. अखेर मंदिर प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी मध्यस्थी केल्यावर शिवाजी द्वारातून केवळ महंतांनाच सोडण्याची सिद्धता पोलिसांनी दर्शवली; पण ‘पुजार्‍यांना या द्वारातून ये-जा करता येणार नाही’, असे पोलिसांनी सांगितल्यावर संतप्त पुजार्‍यांनी तेथेच धरणे आंदोलन केले. या वेळी पुजार्‍यांनी महंतांनाही अडवले.

३. छत्रपती शिवाजी द्वाराच्या खालच्या बाजूलाच पूजासाहित्याची दुकाने आहेत, तसेच अनेक पुजारी आणि मानकरी यांची घरेही तेथेच आहेत. या द्वारातून प्रवेश बंद केल्याने पुजारी आणि भाविक यांच्यात समन्वय होण्यास पुष्कळ अडचणी आल्या.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now