देहलीत गोवंशाच्या हत्येनंतर तणाव : धर्मांध युवकाला अटक !

  • राजधानीतील गोवंशाची हत्याही रोखू न शकणारे भाजप सरकार इतरत्रच्या गोहत्या कधी रोखू शकेल का ?
  • गोरक्षकांकडून झालेल्या कथित मारहाणीविषयी गाजावाजा करणारी हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आता गप्प का ?

नवी देहली – येथील नंदनगरी भागातील एका घरात गोवंशाची हत्या झाल्याच्या घटनेनंतर तणाव निर्माण झाला. या घटनेविषयी नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घरावर छापा मारून उबेर वहाबी या २८ वर्षीय धर्मांध युवकाला अटक केली. त्याचा छोटा भाऊ शहजादसह अन्य एका आरोपीने पोबारा केला.

हिंदुत्वनिष्ठांची निदर्शने !

या घटनेची माहिती मिळताच येथील काही स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जोरदार निदर्शने करत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.


Multi Language |Offline reading | PDF