काँग्रेसकडून काश्मीरविना भारताचा नकाशा प्रसारित : गुन्हा नोंद !

  • राष्ट्रप्रेमींनी अशा देशद्रोही काँग्रेसवर बंदी घालण्याची मागणी केली पाहिजे !
  • भारताच्या नकाशाचे असे उघडपणे विकृतीकरण होत असतांना पोलीस स्वतःहून गुन्हा का नोंदवत नाहीत ? तक्रारीची वाट का पहातात ?

रायपूर (छत्तीसगड) – भारताचा नकाशा काश्मीरविना प्रसारित केल्याच्या प्रकरणी छत्तीसगड भाजपने काँग्रेसच्या विरोधात तक्रार दाखल प्रविष्ट केली. (छत्तीसगड राज्यात आणि केंद्रात सत्ता असतांना भाजपने केवळ विरोधी पक्षांप्रमाणे तक्रार करून न थांबता काँग्रेसवर देशद्रोहाचा खटला चालवावा, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे ! – संपादक) यावर ‘सिव्हिल लाईन्स’ पोलीस ठाण्याचे ठाणे अधिकारी यदुमणी सिदार यांनी ‘सायबर क्राईम’च्या कलमांखाली काँग्रेस पक्षावर गुन्हा नोंद केला.

याप्रकरणी चौकशी चालू असल्याचेही सिदार यांनी सांगितले. (अशा पक्षाने ६ दशकांहून अधिक काळ देशावर कसे राज्य केले असेल आणि काश्मीर प्रश्‍न कसा हाताळला असेल, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक)

घडलेल्या घटनेविषयी सारवासारव करतांना काँग्रेस पक्षाने ‘ही तांत्रिक चूक असून चित्र ‘कॉम्प्रेस’ करतांना असा फोटो सिद्ध झाला’, असे हास्यास्पद स्पष्टीकरण दिले. याशिवाय काँग्रेसने याविषयी क्षमायाचना करत सदर चित्र टि्वटरवरून तात्काळ काढून टाकले. छत्तीसगड काँग्रेसचे जयवर्धन बिरसा यांनी ‘काँग्रेस पक्ष देशाच्या अखंडतेशी प्रामाणिक आहे’, असे सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF