पुणे येथे जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

झारखंड येथील समेध शिखरजी पवित्र तीर्थक्षेत्री पर्यटन क्षेत्र चालू करण्यास विरोध !

किती हिंदूंना त्यांच्या तीर्थक्षेत्राचे असे महत्त्व लक्षात येते ?

पुणे – झारखंड राज्यातील समेध शिखरजी या जैन धर्मियांचे पवित्र तीर्थस्थळ असलेल्या ठिकाणी झारखंड सरकारने पर्यटन चालू केल्याने त्या ठिकाणी अनेक उपाहारगृहांना पर्यायाने मांसाहाराला अनुमती मिळणार असल्याचा आरोप जैन समाजाने केला आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी आणि समेध शिखरजी या पवित्र तीर्थस्थळाच्या संरक्षणाच्या मागणीसाठी येथील जैन समाजातील बांधवांनी १५ ऑक्टोबरला पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.

समेध शिखरजी हे जैन धर्मियांचे पवित्रस्थळ आहे. समेध शिखरजी या ठिकाणी जैन धर्माच्या २४ तीर्थकारांपैकी २० तीर्थकारांचे निर्वाण झाले आहे. त्याच ठिकाणी पर्यटनस्थळ विकसित झाले, तर त्या ठिकाणाचे पावित्र्य धोक्यात येईल, असा दावा जैन बांधवांनी केला आहे. या मोर्च्यात जैन समाजातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Multi Language |Offline reading | PDF