(म्हणे) ‘आतंकवादी मन्नान वानी हिंसाचारातील पीडित !’ – काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती

  • ठार मारलेल्या आतंकवाद्याला ‘पीडित’ संबोधणार्‍या मेहबूबा मुफ्ती राष्ट्रघातकीच होय !
  • आतंकवाद्यांचे उदात्तीकरण करणार्‍या पीडीपीशी भाजपने संधान साधून काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केली, हे जनता कदापि विसरणार नाही !
  • आतंकवाद्यांचे उघड समर्थन करणारे असे पक्ष आणि राजकारणी लोकशाही निरर्थक ठरवतात !

श्रीनगर – काश्मीरमध्ये मन्नान वानी या आतंकवाद्याला भारतीय सुरक्षादलाने ठार केले. या पार्श्‍वभूमीवर पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंटच्या नेत्या आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी वानी हा काश्मीरमधील हिंसाचारातील पीडित असल्याचे वक्तव्य केले आहे. वानी याच्या हत्येनंतर अलीगढ मुस्लिम विद्यापिठात त्याच्यासाठी नमाजपठण करण्यात आले होते, तसेच शोकसभा घेण्यात आली होती. तसे करणार्‍या विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले. देशद्रोहाच्या आरोपाखाली निलंबित केलेल्या या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्याची मागणीही मुफ्ती यांनी केली आहे. ‘या विद्यार्थ्यांच्या पाठीशी पीडीपी पक्ष उभा आहे’, असेही त्यांनी सांगितले.

मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, ‘‘या विद्यार्थ्यांवर दबाव टाकल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. केंद्र सरकारने या गंभीर प्रकरणात हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि अलीगढ मुस्लिम विद्यापिठाच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांवरील कारवाई रहित करावी.’’ ‘काश्मीरमधील अमानुष हिंसाचाराचा बळी ठरलेल्या या विद्यापिठातील आपल्या माजी सहकार्‍यासाठी (मन्नान वानीसाठी) विद्यार्थ्यांनी कार्यक्रम आयोजित केला, तर त्यात अयोग्य काय ?’, असा प्रश्‍न पीडीपीने केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF