योगी आदित्यनाथ यांना भेटल्यानंतर स्वामी परमहंस यांचे राममंदिरासाठीचे उपोषण समाप्त

सद्यस्थिती पहाता कुणी कितीही उपोषणे केली, तरी भाजप सरकार सध्या तरी राममंदिर बांधणार नाही, असेच चित्र आहे. त्यामुळे अशी उपोषणे करण्यापेक्षा साधू आणि संत यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करावे ! हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर हिंदूंच्या सर्वच मागण्यांची पूर्तता करणारे शासन असेल !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – रामजन्मभूमीवर राममंदिराची निर्मिती करण्याच्या मागणीसाठी अयोध्येत उपोषणास बसलेले स्वामी परमहंस यांना योगी आदित्यनाथ यांनी फळांचा रस पाजल्यावर स्वामींनी उपोषण मागे घेतले. १ ऑक्टोबरपासून ते उपोषणाला बसले होते. त्यांना पोलिसांनी बलपूर्वक लक्ष्मणपुरी येथे आणून रुग्णालयात भरती केले होते. त्यांची प्रकृती थोडी चांगली झाल्यावर योगी आदित्यनाथ यांनी त्यांना भेटीसाठी बोलावले आणि त्यानंतर स्वामींनी उपोषण मागे घेतले. ही माहिती योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटर खात्यावरून देण्यात आली; मात्र योगी आदित्यनाथ यांनी स्वामी परमहंस यांना अयोध्येत राममंदिर बांधू अथवा नाही, याविषयी कोणते आश्‍वासन दिले, ते समजू शकले नाही.


Multi Language |Offline reading | PDF