(म्हणे) ‘चांगल्या हिंदूंना एक धार्मिक स्थळ पाडून त्या जागी राममंदिर नको !’ – काँग्रेस नेते शशी थरूर यांचा शोध

  • थरूर यांनी असे कोणते सर्वेक्षण केले, ज्यावरून ते असे विधान करत आहेत ? भारतातील कोट्यवधी ‘चांगल्या’ हिंदूंना अयोध्येत राममंदिर हवे आहे आणि हेच सत्य आहे. निवळ प्रसिद्धीसाठी थरूर अशी विधाने करत आहेत !                                                                                                                                   
  • इस्लामनुसार अन्य कोणाचेही धार्मिक स्थळ पाडून तेथे मशीद बांधणे अयोग्य आहे. त्यामुळे बाबरी मशीद अयोग्यच होती. देशातील लक्षावधी मंदिरांवर मशिदी उभारल्या गेल्या आहेत; मात्र देशात चांगल्या मुसलमानांची संख्या किती आहे ? असतील तर ते अशा मशिदींना विरोध करण्यासाठी पुढे का येत नाहीत ?

नवी देहली – समस्त हिंदु समाजाला वाटते, तसे एक हिंदू म्हणून मलाही यापूर्वी बाबरी मशिदीच्या जागीच राममंदिर व्हावे, असे वाटायचे. अयोध्या ही रामजन्मभूमी आहे, असा मोठ्या प्रमाणावर हिंदूंचा विश्‍वास आहे; मात्र चांगल्या हिंदूंना दुसर्‍याचे प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त करून त्याजागी राममंदिर नको आहे, असे विधान काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एका व्याख्यानमालेत केले. (या शोधासाठी थरूर यांना पुरस्कारच द्यायला हवा ! – संपादक) ‘सध्या राममंदिराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे या क्षणी यावर भाष्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही’, असेही ते म्हणाले. या विधानावरून थरूर यांच्यावर टीका होऊ लागल्यावर त्यांनी ‘हे माझे वैयक्तिक मत आहे. याचा पक्षाशी काहीही संबंध नाही’, असे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच काँग्रेसनेही ‘या विधानाशी पक्षाचा संबंध नाही. हे प्रकरण न्यायालयात आहे आणि न्यायालय जो निर्णय देईल तो पक्ष मान्य करील’, असे म्हटले आहे.

थरूर पुढे म्हणाले की, आगामी काळात निवडणुकीच्या काळात धार्मिक दंगली होऊ शकतात. त्याविषयी मला काळजी वाटते.

थरूर यांच्या विधानामुळे काँग्रेसला हानी ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

थरूर यांच्या विधानावर भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून ‘ज्या व्यक्तीवर हत्येच्या प्रकरणी आरोपपत्र प्रविष्ट आहे, त्या व्यक्तीविषयी काय बोलायचे ? त्यांच्या या विधानामुळे काँग्रेसची हानीच होणार आहे’, असे म्हटले आहे.

मोगल वंशजाकडून राममंदिर उद्ध्वस्त केल्याविषयी क्षमायाचना !

  • राममंदिराला विरोध करणारे अन्य मुसलमान स्वतःला मोगल वंशजांपेक्षा अधिक मोठे समजत आहेत का ?                                  
  • मोगलांनी केवळ राममंदिर उद्ध्वस्त केले नसून शेकडो मंदिरांची तोडफोड केली, हिंदु महिलांना बाटवले आणि हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. याविषयीही मोगलाच्या वंशजांनी हिंदूंची क्षमा मागावी !

लक्ष्मणपुरी – शेवटचा मोगल बादशहा बहादुर शहा जफर यांचे वंशज राजकुमार याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी त्यांच्या पूर्वजांनी राममंदिर उद्ध्वस्त केल्याविषयी क्षमायाचना केली आहे. तुसी यांनी नुकतीच अयोध्येला भेट दिली. या वेळी हिंदु महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी हेही उपस्थित होते. या वेळी त्यांनी डोक्यावर श्रीरामांच्या पादुका ठेवून पूर्वजांनी केलेल्या चुकांविषयी प्रतिकात्मक प्रायश्‍चित्त घेतले. तुसी यांनी राममंदिर निर्माण न्यासाचे अध्यक्ष महंत जन्मेजयशरण महाराज यांनी आयोजित केलेल्या एका बैठकीलाही उपस्थिती दर्शवली. तुसी अयोध्येत झालेल्या शिलापूजन कार्यक्रमातही सहभागी झाले होते. ‘राममंदिराचे काम चालू झाल्यावर मी येथे सोन्याची वीट रचीन’, असेही ते म्हणाले.

राममंदिरासाठी विश्‍व हिंदु परिषद प्रत्येक राज्यातील राज्यपालांना निवेदन देणार

  • निरर्थक गोष्टींमध्ये वेळ घालवणारी विहिंप !                                                                                                                                   
  • मागील साडेचार वर्षे केंद्रात भाजपचे सरकार असतांना विहिंपने त्याच्यावर दबाव निर्माण करून एव्हाना राममंदिर उभारणे अभिप्रेत होते. आताही तसे करण्याऐवजी राज्यपालांना निवेदने देण्यासारख्या गोष्टींत वेळ दवडणारी विहिंप !
  • ‘राममंदिराचे प्रकरण न्यायालयात आहे आणि न्यायालयाचा निर्णय आम्ही मान्य करू’ या व्यतिरिक्त राज्यपाल काय उत्तर देणार आहेत ? निवळ हिंदूंची दिशाभूल करण्यासाठी विहिंप अशी कृती करत आहे का ?

नवी देहली – विश्‍व हिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी म्हटले आहे की, राममंदिराच्या बांधकामासाठी जागरूकता आणि जनमत निर्माण करण्यासाठी देशातील प्रत्येक राज्याच्या राज्यपालांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच संसदेत कायदा बनवण्यासाठी पुढील मासामाध्ये खासदारांवर दबाव निर्माण करणार.

आलोक कुमार म्हणाले, ‘‘राममंदिराचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. (असे आहे, तर निवडणुकीच्या काळातच हे सूत्र कसे पुढे आणले जाते ? – संपादक) हा कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा प्रश्‍न आहे. सर्व कायदेशीर बाधा दूर करून राममंदिर लवकरात लवकर बांधले गेले पाहिजे.’’ (हे विहिंपला माहिती आहे, तर गेल्या साडेचार वर्षांत विहिंपने यासाठी काय प्रयत्न केले ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now