नवरात्रीत दांडिया खेळतांना शारीरिक संबंधांसाठी वापरल्या जाणार्‍या ‘स्टे ऑन’चा उपयोग करण्याचे विज्ञापनातून आवाहन

हिंदूंच्या पवित्र सण आणि उत्सव यांना चंगळवादाचे स्वरूप देणार्‍यांचा सनदशीर मार्गाने निषेध करा !

सहिष्णु हिंदूंच्या सणांच्या वेळी असे आवाहन करणारे अन्य धर्मियांच्या उत्सवांच्या वेळी असे आवाहन करण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ?

मुंबई, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदूंना पवित्र असलेल्या नवरात्रोत्सवामध्ये देवीची कृपा संपादन करण्यासाठी गरबा खेळला जातो. या वेळी शारीरिक संबंधांच्या वेळी वापरले जाणारे ‘स्टे ऑन’ हे शक्तीवर्धक ‘कॅप्सूल’ वापरण्याचे आवाहन करून ‘स्टे ऑन’ने नवरात्रीमध्ये खेळल्या जाणार्‍या दांडियाला रंगेल ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. याविषयी ‘स्टे ऑन’ने काढलेल्या विज्ञापनामध्ये नवरात्रीमध्ये सर्व दिवस ‘स्टे ऑन’चा उपयोग करा आणि आपल्या सहचार्‍याला संतुष्ट करा’, असे अश्‍लाघ्य आवाहन केले आहे. याविषयी धर्माभिमानी हिंदूंकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी शारीरिक संबंधांच्या वेळी वापरल्या जाणार्‍या ‘प्ले विन’कडूनही अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now