भारतीय सैन्याने केलेल्या विरोधानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करणार्‍या चिनी सैनिकांची माघार

चीन जाणीवपूर्वक कुरापती काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि भारत केवळ बचावात्मक पवित्रा घेत आहे. भारतानेही चीनला जशास तसे उत्तर देण्याची आवश्यकता आहे; मात्र तसे करण्याचे धाडस भारतीय शासनकर्ते करत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !

नवी देहली – अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्यानंतर भारतीय सैनिकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे ते माघारी गेल्याची घटना १० दिवसांपूर्वी घडल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही अनेकदा चिनी सैन्याने भारतीय सीमेमध्ये घुसखोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत.

१. वास्तविक नियंत्रणरेषेवरील अरुणाचल सेक्टरमध्ये चिनी सैनिकांनी ही घुसखोरी केली. ‘तुम्ही भारताच्या सीमेमध्ये आला आहात’, असे भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना सांगितल्यानंतर ते त्यांच्या सीमेमध्ये परतले, असे वृत्त ‘एएन्आय’ वृत्तसंस्थेने दिले आहे.

२. इंडो-तिबेट पोलीस दलाच्या अहवालानुसार २७ ऑगस्टला चीनचे २ हेलिकॉप्टर्सही लडाखमधील भारताच्या सीमेमध्ये आले होते. जवळपास ५ मिनिटे हे दोन्ही हेलिकॉप्टर भारतीय हवाई सीमेमध्ये घिरट्या घालत होते.


Multi Language |Offline reading | PDF