भाजप सरकारच्या कार्यकाळात प्रतिवर्षी भुकेमुळे मरणार्‍या लोकांच्या संख्येत वाढ !

भाजप सरकारमुळे देशाची झालेली ‘प्रगती’ !

नवी देहली – भुकेमुळे मृत्यू पावणारे लोक असणार्‍या ११९ देशांच्या सूचीमध्ये भारत १०३ क्रमांकावर आहे. (या सूचीमध्ये जो देश सर्वांत वरच्या क्रमांकावर असतो, तेथील भूकेमुळे मरणार्‍या लोकांची संख्या अल्प असते) वर्ष २०१८ च्या ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’मध्ये ही सूची देण्यात आली आहे. वर्ष २०१४ मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात भारत ५५ व्या स्थानी होता.

१. भारताच्या तुलनेत शेजारील देशांची स्थिती चांगली असल्याचे या सूचीतून दिसून आले आहे. चीन २५, बांगलादेश ८६, नेपाळ ७२, श्रीलंका ६७, तर म्यानमार ६८ क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान भारताच्या नंतर म्हणजे १०६ व्या क्रमांकावर आहे.

२. ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’चा प्रारंभ वर्ष २००६ मध्ये ‘इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट’ने केला होता. यातून जगभरातील देशांमधील खाद्यापदार्थांविषयीची माहिती दिली जाते. उदा. त्याची गुणवत्ता, मात्रा आणि त्यातील त्रुटी सांगितली जाते. प्रतिवर्षी यानुसार सूची घोषित केली जाते.


Multi Language |Offline reading | PDF