पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अनेकदा आठवण करूनही राममंदिर बांधण्याविषयी उत्तर नाही ! – मोगल वंशज याकूब हबीबउद्दीन तुसी

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अनेक इमेल पाठवून राममंदिर बांधण्याची मागणी केली; मात्र त्यांच्याकडून एकदाही उत्तर आले नाही. जर भाजप याविषयी काही करण्यास अपयशी ठरत असेल, तर मी मंदिर बांधण्यासाठी भाजपच्या सहकारी पक्षांचे साहाय्य घेईन, अशी माहिती अंतिम मोगल बादशहा बहादुरशहा जफर यांचे वंशज याकूब हबीबउद्दीन तुसी यांनी म्हटले आहे. तुसी पुढे म्हणाले की, भाजपकडून याविषयी कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने मी ज्योतिष आणि द्वारका पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांना संपर्क केला.


Multi Language |Offline reading | PDF