महाराष्ट्र सरकार घरपोच मद्य पोहोचवण्याची योजना चालू करण्याच्या सिद्धतेत !

वाहतूक अपघात रोखण्याच्या नावाखाली भाजप सरकारची अघोरी उपाययोजना

सामाजिक कार्यकर्त्यांच्या टीकेनंतर सरकारचे घुमजाव !

  • काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या एक पाऊल पुढे गेलेले भाजप सरकार ! पवार वाण्याच्या दुकानात बीअर देण्याचा मानस व्यक्त करत होते; तर भाजप सरकारने आता मद्य थेट घरपोच करण्याचे केलेले वक्तव्य हे अधोगतीकडे नेणारे आहे. भाजपला अपेक्षित असा हा विकास कुणाला हवा आहे ? हिंदूंनो, यासाठीच हिंदु राष्ट्राची स्थापना करा !                                                                                             
  • मद्य पिऊन होणारे अपघात टाळण्यासाठी मद्यबंदीचा उपाय करायचा सोडून मद्य घरपोच करण्याचा उपाय म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असे आहे ! महसुलासाठी देशाला मद्यपी बनवू पहाणारे आतापर्यंतचे शासनकर्ते आंतरराष्ट्रीय आस्थापनांच्या षड्यंत्राला बळी पडून देशाला विनाशाकडे नेत आहेत !

मुंबई – दारू हवी असणार्‍यांना ती घरपोच देण्याची नवी योजना राज्यात चालू करण्याचा विचार राज्यशासन करत आहे, असे प्रतिपादन उत्पादनशुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. एवढेच नव्हे, तर त्याच्या कार्यवाहीच्या अंतर्गत येणारे काही बारकावेही सांगितले. विशेष म्हणजे दारू पिऊन वाहन चालवणे (ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह) आणि रस्त्यावरील अपघात रोखणे यांसाठी ही योजना शासन चालू करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या टीकेनंतर अशी योजना नसल्याचे सांगून त्यांनी घुमजाव केले.

याविषयी अधिक माहिती देतांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, दारूच्या उद्योगासाठी ही योजना ‘गेम चेंजर’ ठरेल. अशी योजना चालू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल. (महाराष्ट्राला ‘मद्यपी राष्ट्र’ करू पहाणारे आणि त्याचा अभिमान बाळगणारे मंत्री पुन्हा निवडून आले, तर काय होईल ? – संपादक) ज्याप्रमाणे इ-कॉमर्स संकेतस्थळाच्या माध्यमातून भाजी, फळे घरपोच मिळतात, त्याप्रमाणे दारूही घरपोच येईल.

दारूबंदीची मागणी करणार्‍या कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी मात्र सरकारच्या या योजनेवर कडाडून टीका केली.


Multi Language |Offline reading | PDF